fbpx

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे जिल्ह्यातील राजकारण निघाले ढवळुन

तुळजापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डाँ. पदमसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि उस्मानाबाद कळंब मतदार संघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे जिल्हयात खळबळ उडाली असुन तीन विधानसभा मतदार संघातील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजपा प्रवेश सोहळा मागील पंधरा दिवसापासून जिल्हयात चर्चेत आहे. मात्र ही चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. राणाजगजितसिंह पाटील यांचा जर भाजपा प्रवेश झाला तर मात्र  युतीमध्ये गोची निर्माण होणार आहे. राणाजगजितसिंह पाटील आपल्या बरोबर भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार राहूल मोटे यांना घेवुन भाजपात प्रवेश करण्याची मनस्थितीत आहेत अशी चर्चा आहे.

मात्र या प्रकरणी राहुल मोटे यांनी प्रवेश बाबतीत पत्रकार परिषद घेवून या वृत्ताचे खंडन केले आहे.राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघ लढवावा अशी आँफर भाजपा कडून असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राणादाचा भाजपा प्रवेशाचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. त्यामुळे हा गुंता भाजप कसा सोडविणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राणादा राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार का ? या बाबतीत मोठी उत्सुकता जिल्हयात निर्माण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २५ ऑगस्ट रोजी जिल्हयात येणार आहे. या नंतर पुढचे चित्र स्पष्ट होणार आहे.