उस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील?

उस्मानाबाद : लोकसभेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर  अखेर शिक्कामोर्तब  झाल्याची माहित विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उस्मानाबाद लोकसभेला सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पद्मसिंह पाटील हे उभा राहणार नसल्याने त्यांचा जागी नवीन उमेदारांची चाचपणी सध्या सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी फिक्स झाल्याचे कळते आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण आहे. अनेक नावे चर्चेत असली तरी यावेळीही पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार असल्याचं चित्र सध्यातरी आहे. त्यातच आता राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिल्याने पुन्हा पद्मसिंह पाटील यांच्याच कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार हे निश्चित.

सध्यातरी राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार आणि शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यातच हा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण यांचीही नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.