राणा जगजितसिंह म्हणजे राजकारणातील सोंगाड्या, नगराध्यक्ष राजेनिंबाळकरांनी डागली तोफ

टीम महाराष्ट्र देशा: उस्मानाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजप प्रवेश करणार असल्याची सुरु आहे. पाटील यांनी प्रवेशासंदर्भात भाजप नेत्यांची भेट घेतल्याच वृत्तप्रसिद्ध झाले होते. राणा जगजितसिंह यांनी मात्र भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा केला आहे. तर उस्मानाबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पाटील यांच्या खुलाशावर बोचरी टीका केली आहे.

राणा जगजितसिंह म्हणजे राजकारणातील सोंगाड्या असल्याचं म्हणत राजेनिंबाळकर यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहीत टीका केली आहे. तुम्ही सत्तेशिवाय राहु शकत नाहीत. समाजहित वैगरे काहीच नाही. केलेला काळाबाजार तुम्हाला झाकायचाय. विरोधात राहिलात तर तुमच्या मुंबईतल्या या साम्राज्याला सुरुंग लागण्याची कुणकुण लागल्यानेच निघालात ना खुषाल जा कितीही आदळाआपट करा, पण पराभव तुमची पाट सोडणार नाही, अशी टीकाही राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

Loading...

मकरंद राजेनिंबाळकर यांची फेसबुक पोस्ट

….राजकारणातील सोंगाड्या….

म्हणे खोट्या बातम्या…. मग हिंमत होतेय का मी –वादी सोडणार नाही, असे सांगण्याची? कुठ जायचय ते खुशाल जा, पण, दोष पत्रकारांना कशासाठी देताय? जिल्ह्यातील सर्वच माध्यम तुमच्या पाठीशी राहूनही त्यांना दोष द्यायला जरा स्वतःची …तपासा. काल परवा पर्यंत याच सरकारवर टीका करीत होता शेतकरी विरोधी सरकार म्हणत होता उने-दुणे काढीत होता.जातीयवादी म्हणत होता.तीन-तीन पानाची प्रेसनोट काढून सरकारने केलेल्या कामाच श्रेय स्वतः घेत होता पण, इथली जनता खोट श्रेय देत नाही, हे तुमच्या लक्षात आलय. त्यामुळे आता आपण सरकारमध्ये जावून श्रेय घ्यावं, या हेतूने तुम्ही –वादीला सोडचिठ्ठी देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत आहात. मग, माध्यमांनी अशाघडामोडींवर बातम्या लिहिल्यावर एवढी तडफडाट करण्याची काय गरज आहे? त्यांना स्वातंत्र आहे. लिहू द्या ना… त्यांना खोट ठरवून काय साध्य करणार?

तसं तुम्ही कागदावरचे प्रेसनोट पैलवानच ना. श्रेय कसं घ्यायच.कागद कसे पुढे सरकवायचे. यातली डाँक्टरेट देणच बाकी राहिलय. तेही मिळेल ट्रस्टकडून. जिल्ह्यात काही घडामोड झाली की तीन चार पानाची प्रेसनोट आलीच. पण, खर काय, अन खोट काय, हे जनतेला कळालय. म्हणे तथ्यहिन बातम्या…. घोडामैदान लांब नाही. कळेलच ना… कशात तथ्य आहे ते. मग….प्रत्येक पत्रकारांच्या कार्यालयात जावून माफी मागवी लागेल….

युती शासनाने २१ टीएमसी पाण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याचे आभार जरूर माना, मानावेच लागतील. पण, तुम्ही पाटबंधारेमंत्री असताना तुम्ही २१ टीएमसी पाणी आणले नाही, याचे उत्तर तुम्हालाच जनतेला द्यावेच लागेल. सध्या जिल्ह्यावर असलेला दुष्काळ व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हे पाप तुमचेच. ही जनता कदापिही विसरणार नाही.

म्हणे, राजकारण समाजहितासाठीच पाटबंधारे, उर्जा, गृह ही सर्व पदे घरातच होती. काय कमी केलय,..वादीने… तुम्हाला. साधा ग्रामपंचायत सदस्याचा अनुभव नसताना देखील तुम्हाला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान दिल. तुम्हाला मंत्री केल.काय दिवे लावलात तुम्ही. उद्योगमंत्री असताना एक तरी उद्योग जिल्ह्यात आणलात का? एका तरी उद्योगातून जिल्ह्यातील युवकाला रोजगार मिळालाय का? तुम्ही उद्योगमंत्री असताना औद्योगिक वसाहतीत विश्रामगृह बांधले. बांधकामासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला.औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणण्याच्या ऐवजी विश्रामगृह बांधकामाला प्राधान्य देता. यावरूनच तुमची समाजहिताची दूरदृष्टी दिसून येते. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जनतेच्या हितासाठी एवढी पदे दिली होती. पण, इथल्या जनतेची, शेतकऱ्यांची दिशाभूल करीत केवळ स्वतःच हीत साधल. त्यामुळेच ही वेळ आलीय तुमच्यावर. म्हणे आम्ही राजकारणात समाजहितच पाहिलंय.

३० वर्षात समाजहित पाहिल असत तर जिल्हा सुजलाम-सुफलाम दिसला असता. निती आयोगाच्या यादीत तर नक्कीच आला नसता.जेट्रोपा, टेक्साटाईल पार्क, मोझर बेअर, बाँबे रेआँन अशी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीची वेगवेगळी नावे ऐकूण एक पिढीच बरबाद केलीय तुम्ही. व्हिडिओकाँन कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमीनी खरेदी केल्या. त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले. पुढे कारखाना जळाला की जाळला?…. पण, आज ती जमिन कोणात्या संस्थेच्या नावावर आहे. व त्या संस्थेवर कोण-कोण पदाधिकारी आहेत. याचेही उत्तर जनतेला द्या. तसेच वडगाव-सिद्धेश्वर येथील धाराशिव कुकुटपालन संस्था जिल्हा बँकेच्या कर्जात बुडविली. त्याचा लिलाव करून स्वतःच्या मर्जीतील खासगी कंपनीस कोट्यावधीची जमीन कवडीमोल किंमतीस (लिलाव मॅनेज करून) देऊन त्या बदल्यात खासगी कंपनीकडून स्वतःच्या कुटुंबाला मिरविण्यासाठी ५५११ च्या किती गाड्या बक्षीस मिळविल्यात. हेही जनतेला सांगावे. समजहितासाठी नाही तर इडी आणि सीबीआयच्या चौकशीचा फास नरड्याला बसू नये, म्हणून उड्या हानीत निघालात. म्हणूनच तुम्हाला राजकारणातील सोंगाड्या अशी पदवी लोक बहाल करीत आहेत.

म्हणे पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागातील गावे दत्तक घेणार…..तिथली गावे जरूर दत्तक घ्या. पण, बुद्धी नावाची चीज आहे का तुमच्याकडे? 1993 मध्ये जेव्हा भूकंप झाला होता, तेव्हा किती गावे दत्तक घेतली होती? गेली पाच-सहा वर्षे जिल्ह्यात भयानक दुष्काळ आहे. काय केलात ट्रस्टच्या माध्यमातून इथल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी? साधी चारा छावणी सुरू करण्याची ऐपत नव्हती का ट्रस्टची? मग कशाला नाटक करताय…सांगली, कोल्हापूरात जावून गावे दत्तक घेण्याचं. का इथला शेतकरी तुमचा दुष्मन हाय? शेतकरी राजाला देण्यासाठीपण दानतच लागतेय. कधीतरी दुसऱ्याच्या हातावर —- माहिती आहे का तुम्हाला.अन निघाले पूरग्रस्त भागातील गावे दत्तक घ्यायला. प्रेसनोटच्या माध्यमातून बढाया मारायचा एखादा कोचिंग क्लास सुरू करा. तसे तुमच्याकडे बरीच थिंक टँक आहे.
घेतील दररोज क्लासेस.तुळजाभवानी ट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी….निघाली प्रेसनोट… का तुमच्या ट्रस्टला काय भीक लागलीय… इथल ट्रस्ट मुंबईला, इथल मेडीकल काँलेज नेरुळला. जरा जनाची नाही तर मनाची तरी पाळा. कशासाठी हे ट्रस्ट तयार केल होत? शेतकरी जीवाच रान करून उसाच उत्पादन घेतात. त्यांच्या ऊसबीलातील पैशे काटून जमा झालेल्या पैशावर ट्रस्ट तयार झाले. मग यातून शेतकरी हितच जपल पाहिजे होतं. शेतकऱ्यांच्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी आर्थिक मदत करणे. तसेच शेतकऱ्यांना नवीन बोअरवेल पाडून देणे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे हा ट्रस्टचा मूळ उद्देश होता. ट्रस्ट स्थापनेच्या सुरुवातीची काही वर्षे या ट्रस्टमधून अशी कामे झाली.जेव्हा तुमच्या हातात, हे ट्रस्ट आल, तेव्हा शेतकरी वाऱ्यावर सोडलात.सामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या घामाने तयार झालेल ट्रस्ट तुम्ही स्वतःच्या मालकीच केलय.

गरीब माणसांच रक्त शोषून स्वतःच साम्राज्य वाढविल ना. अशा राक्षसी वृत्तीच्या माग जनतेनं का राहाव? जेव्हा राजेनिंबाळकर कुटुंबिय ट्रस्टच्या कारभाराविरोधात २००२ मध्ये न्यायालयात गेले. तेव्हा तुम्ही आरोग्य शिबिर घेण्याचे,तपासणीचे सोंग सुरु केले. तुम्ही इथल्या लोकांना मुंबईला उपचारासाठी बोलावताय. इथल्या रुग्णांच्या तापसणीच सोंग करताय. तेरणा नदीच्या काठावर असलेल्या तेरणा कारखान्याच ट्रस्ट जिल्ह्यातच असत, तर काय गरज पडली असती मुंबईला जायची? पण, तुम्हाला स्वतःच्या तुंबड्या भरायच्या होत्या. म्हणूनच तुम्ही हे ट्रस्ट मुंबईत घेऊन गेला मासा पाण्याशिवाय राहु शकत नाही, तसे तुम्ही सत्तेशिवाय राहु शकत नाहीत. समाजहित वैगरे काहीच नाही. हा काळाबाजार तुम्हाला झाकायचाय. विरोधात राहिलात तर तुमच्या मुंबईतल्या या साम्राज्याला सुरुंग लागण्याची कुणकुण लागल्यानेच निघालात ना. खुषाल जा कितीही आदळाआपट करा, पण पराभव तुमची पाट सोडणार नाही. आता माफी नाही…. जनतेने तुम्हाला नाकारलय आणि यापुढेही नाकारणार…
हेच त्रिकालाबाधीत सत्य!

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक