नागपूर : आज नागपूर मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य दाखल झाले आहे. नागपूरमध्ये राणा दाम्पत्य यांच्या हस्ते मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करण्यात आली.
यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.