रामटेकडी कचरा डेपोला वाढता विरोध; स्थानिकांनी काम बंद पाडले

हडपसर येथील रामटेकडी येथे पुणे महापालिकेच्या वतीने नवीन कचरा प्रकल्पाच काम सुरु करण्यात आल आहे. मात्र स्थानिक नागरीकांकडून याला जोरदार विरोध केला जात आहे. आज कचरा डेपोच्या याच कामाला विरोध करत विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी आमदार महादेव बाबर व स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडले.

रामटेकडी येथे 23 एकरामध्ये कचराडेपोच्या कामाचे नियोजन केले आहे. याला भाजप वगळता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलत कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिक आणि नेत्यांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. हा कचरा डेपो झाल्यास नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना समोर जाव लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा डेपो होवून देणार नाही असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. पूर्वीपासून हडपसर येथे कचरा प्रकल्प चालू आहेत. याचा त्रास मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच सध्यस्थितीत सुरु असणाऱ्या प्रकल्पात योग्य प्रकारे कचरा प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या विषयी बोलताना विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले कि ‘रामटेकडी जवळ हवेच्या दिशेने नागरीक राहत असलेल्या बाजूला सध्या या नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागेल. अशाच पद्धतीचा प्रकल्प कोथरूड येथे होता. मात्र स्थानिक भाजप आमदारांच्या विरोधामुळे तो बंद करण्यात आला. त्यामुळे हडपसरला वेगळा आणि कोथरूडला वेगळा न्याय का दिला जात आहे’

यावेळी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, येथे कचरा डेपो आम्ही होऊ देणार नाही. हडपसरला चार कचरा डेपो आहेत. त्यात हा पाचवा प्रकल्प आम्ही कसल्याही परिस्थिती होऊ देणार नाही. कचरा डेपोसाठी शहरात कुठे जागा मिळत नसल्याने महापालिकेने हडपसरला कचरा सिटी बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ससाणे यांनी केली.

 Loading…
Loading...