सत्तेविना विरोधकांची अवस्था जलाविना मासळी सारखी झाली आहे : राम शिंदे

Ram-Shinde-

अहमदनगर – विरोधकांना नेहमी सत्तेची सवय होती. परंतु मागील चार वर्षात त्यांची अवस्था जलाविना मासळी सारखी झाली आहे. आमच्यासारखे राजकीय वारसा नसणारे मंत्री त्यांना मान्य नव्हते. मात्र राज्यात जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, उज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजना या प्रभावीपणे राबविल्याने जनतेचा भाजपावरील विश्वास अधिक बळकट झाला आहे. यामुळे भाजपावरील लोकांचा विश्वास वाढत आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे भाजपाची संघटनात्मक रचना पॉवर फुल झाली असून, आगामी निवडणुका मोठ्या फरकाने जिंकू असा आत्मविश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.

भाजपाच्यावतीने एमआयडीसी जिमखाना येथे आयोजित अहमदनगर लोकसभा क्षेत्रातील शक्तीकेंद्र प्रमुख व विस्तारक बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री राम शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आ.बाळासाहेब मुरकुटे,आ.मोनिका राजळे, माजी आ.बबनराव पाचपुते, माजी आ.चंद्रशेखर कदम, अस्मिता पाटील, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, प्रसाद ढोकरीकर, श्याम पिंपळे, अरुण मुंडे, संतोष लगड आदि मान्यवर उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले राम शिंदे ?

विरोधकांना नेहमी सत्तेची सवय होती. परंतु मागील चार वर्षात त्यांची अवस्था जलाविना मासळी सारखी झाली आहे. आमच्यासारखे राजकीय वारसा नसणारे मंत्री त्यांना मान्य नव्हते. मात्र राज्यात जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, उज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजना या प्रभावीपणे राबविल्याने जनतेचा भाजपावरील विश्वास अधिक बळकट झाला आहे. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत पक्षाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला नामोहरम केले आहे. शक्तीकेंद्र प्रमुख हे पक्षाचा आधारस्तंभ असून, उद्याचे नेते आहेत. भविष्यात ते आमदार-खासदार देखील होतील. त्यामुळे ही सुवर्णसंधी समजून प्रत्येकाने काम करावे, पक्षाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख हे विरोधकांची विकेट घेतील.