रामराजे-उदयनराजे वाद पेटला , रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळला

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितीन शिंदे , संतोष घाडगे यांना अटक केली आहे. रामराजेंनी उदयनराजे भोसलेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना करत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. याचेच पडसाद आज उमटताना दिसत आहेत.

उदयनराजेंच्या समर्थकांनी रामराजेंच्या टीकेचा निषेध करत रामराजेंचा पुतळा भर रस्त्यात जाळला आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले हा वाद जुना असून साताऱ्यामध्ये पक्षांतर्गत वाद पुन्हा समोर येताना दिसत आहे.

काय म्हणाले होते रामराजे नाईक निंबाळकर

साताऱ्यात पिसाळलेली तीन कुत्री आहेत, ती जागेवर येईपर्यंत आपणही पिसाळलेलेचं राजकारण करू, अशी टीका करत रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली होती. तसेच शरद पवारांनी उदयनराजेंना आवरा, अन्यथा आपण पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे.