fbpx

आम्ही जिल्ह्यात नसल्याने अनेकांच्या ‘कॉलर’वर होतात; रामराजेंची उदयनराजेंवर टीका  

सातारा: आम्ही जिल्ह्यात नसल्याने अनेकांच्या कॉलर वर होतात, साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी कोणाला देयची हे पक्षाध्यक्ष खा शरद पवार ठरवतील. सध्यातरी कोणाचेही नाव फायनल झालेले नाही.  दिल्लीला आम्हालाही जाता येत म्हणत विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हिंमत असेल तर मैदानात उतरा अपक्ष उमेदवार म्हणून एका एकाची पुंगी वाजवतो असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. तसेच आपल्या स्टाईलमध्ये कॅालर उडवत त्यांनी राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील आमदारांना सज्जड दम भरला. ‘लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या… अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच असा इशारा त्यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला होता.

उदयनराजे यांच्या वक्तव्यानंतर आता रामराजे निंबाळकर यांनी निशाना साधला आहे. कर्नाटक राज्यातील निकालानंतर खासदार शरद पवार राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतील. त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हालाही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे विधान करत उदयनराजेंचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली

1 Comment

Click here to post a comment