नीरेच पाणी पक्षबदलाच्या वळणावर, या ‘राजें’च्या शिवसेना प्रवेशाची चर्चा

टीम महाराष्ट्र देशा: नीरा देवधरच्या पाण्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण पावसाळाच्या तोंडावर पेटले आहे, रामराजे नाईक निंबाळकर आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांना आवराव, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत, असा इशारा रामराजे यांनी दिला होता, त्यामुळे रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचे बोलले जात आहे.

साताऱ्यामध्ये रामराजे आणि खा उदयनराजे यांच्यामध्ये असणारा वाद लोकसभा निवडणुकी दरम्यान शमला होता, शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने काहीकाळ दोन्ही राजेंनी तलवारी म्यान केल्याचं पहायला मिळालं. मात्र आता बारामती इंदापूरला जाणारे नीरा देवधरचे पाणी बंद केल्यानंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रामराजे निंबाळकर शिवसेना प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Loading...

रामराजे विरुद्ध खा. उदयनराजे वाद

दुष्काळी भागाला पाणी देण्याचा अध्यादेश चौदा वर्षात का काढला नाही, असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री, कृष्णा खोऱ्याचे मंत्री तसेच स्वतःला भगीरथ समजणाऱ्याने फक्त लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी केल्याचा टोला उदयनराजे यांनी लगावला.

दरम्यान, उदयनराजे यांच्यावर पलटवार करताना रामराजे निंबाळकर यांनी त्यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी केली होती. साताऱ्यात पिसाळलेली तीन कुत्री आहेत, ती जागेवर येईपर्यंत आपणही पिसाळलेलेचं राजकारण करू, असा इशारा देत रामराजे यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...