सकाळपासून लिटरवर असणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये

chatrapti udyanraje bhosale and ramraje naik nimbalkar

सातारा: आमच्या पाठीशी आमचे नेते खा शरद पवार असल्याने आम्ही केवळ विकासाची भाषा करतो. सकाळपासून लिटरवर असणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये म्हणत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांची श्रध्दा कोणावर आहे ते सर्वांना माहिती असल्याचंही ते म्हणाले.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये असणारा कलगीतुरा नवीन नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून हा संघर्ष आणखीनच वाढल्याच दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमामध्ये खा उदयनराजे यांनी नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

यावेळी बोलताना टिकाटिप्पणी करताना प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. जिल्ह्यात माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत असतील तर ते मी सहन करून घेणार नाही. आतापर्यंत मी सहन करत आलो आहे, पण सहनशक्तीलाही मर्यादा आहेत. लबाडी मी केली नाही, सडेतोड उत्तर द्यायला मी तयार आहे. समोरासमोर कुठेही, केव्हाही, कोणत्याही व्यासपीठावर बोलवा, माझी तयारी आहे. पण फलटणकरांनी बांडगुळपणा सोडला पाहिजे. फलटणकरांनी हाक द्यावी, कोणताही प्रश्न हाताळायला तयार असल्याच उदयनराजे म्हणाले होते.

दरम्यान, आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हातपाय बांधलेत असे समजू नका, केवळ शरद पवारांमुळे गप्प बसत असल्याच उत्तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.