स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा

हिस्सार (हरियाणा) : देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेला स्वयंघोषित गुरु रामपाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर आज कोर्टानं त्याच्यासह 15 जणांना जन्मठेप सुनावलीय. आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. 2006 पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २०१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

18 नोव्हेंबर 2014 रोजी रामपालच्या सतलोक आश्रमात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही महिला रामपालची भक्त होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणीदेखील रामपालविरोधात सुरू असलेल्या इतर खटल्यांच्या सुनावणीसोबत घेण्यात आली. तर दुसरं प्रकरण 19 नोव्हेंबर 2014 चं आहे. त्यावेळी रामपालचे भक्त आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी हिंसाचारदेखील झाला होता. त्यात 4 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता.

मिलिंद एकबोटेंना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन , तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा