fbpx

स्वप्नांच्या मागे सुसाट धावणाऱ्या ‘रंपाट’ चा टीजर आउट

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडच्या मागोमाग मराठी फिल्म इंडस्ट्री नव्या विचारांसह आणि सामाजिक प्रश्नांसह प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवत आहे. प्रेक्षकही अशा चित्रपटाना भरभरून प्रतिसाद देतात. मुळशी पॅटर्न, आनंदी गोपाळ हि त्याचीच उदाहरण !

रवी जाधव दिग्दर्शित ‘रंपाट’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या फिल्म चा टीजर आउट झाला आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘अचाट स्वप्नांच्या मागे सुसाट धावणाऱ्या अस्सल मातीतील मराठी मुलांची कथा ‘रंपाट’!!! अस या फिल्म च वर्णन केल आहे.

टीजर मध्ये असलेल्या मराठी रपमुळे या चित्रपटाची तुलना नुकत्याच सुपरहिट झालेल्या गल्ली बॉय या चित्रपटाशी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना कितपत रुचतो हे तर रिलीज झाल्यानंतरच समजेल.