दलित उच्च पदावर जात आहे विरोध करू नका रामदास आठवलेचे विरोधकांना आवाहन

देशाचे उच्च पद असणाऱ्या राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने एक दलित व्यक्ती विराजमान होणार असल्याने विरोधकांनी त्यांना विरोध करू नये असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केल आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून नरेंद्र मोदी हे दलित विरोधी , संविधान विरोधी असल्याची टीका विरोधक करायचे मात्र रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देऊन मोदींनी विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम केले आहे तसेच दलित विरोधी असल्याचा आरोप खोडून काढण्याचं कामही मोदींनी केल ही आठवले यांनी बोलताना सांगितल आहे.

उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार
राष्ट्रपती पदासाठी एनडीएडे 20 हजात मते कमी पडत असून शिवसेनेन कोविंद यांना पाठींबा द्यावा यासाठी रामदास आठवले उद्या उद्धव ठाकरेंनी भेट घेणार आहेत.