भाजी विकणाऱ्या बापाचे ‘हाल’ पाहिले, रमेशने जिद्द ठेवून दहावीत घवघवीत यश मिळवले

ramesh nandanvar

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थीनीचा निकाल ९६.९१ टक्के लागला असून विद्यार्थीचा – ९३.९० टक्के लागला आहे. तर यंदाही राज्यात मुलीच अव्वल आहेत. दुसरीकडे सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के लागला असून सरासरी माघील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.

बाप हातमजुरी करतो तर आई धुणीभांडी, लेकीने ९४ टक्के गुण मिळवत कष्टाचे चीज केले…

दुसरीकडे नागपूर शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकणाऱ्या निखिल रमेश नंदनवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी व त्याचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. वडिलांच्या व्यवसायात मदत करताना रमेशला त्यांच्या कष्टांची जाणीव झाली अन मग जिद्दीला पेटून रमेशने दहावीत घवघवीत यश मिळवल आहे.

अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा हा विद्यार्थी असून त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत सर्व अभ्यास केला होता. त्याच्या निकालाची वार्ता घेऊन जेव्हा शिक्षक त्याच्या घरी गेले तेव्हा तो आठवडी बाजारात भाजी विकण्यासाठी गेल्याचे कळले. त्याला जेव्हा ही आनंदवार्ता कळवली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. शिक्षक व आईवडिलांच्या पाया पडून तो पुन्हा भाजी विकण्यासाठी निघून गेला. त्याचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेतकरी बाप गेल्याचं दु:ख पचवत सानिकाने परीक्षा दिली, ९७ टक्के गुण मिळवत पांग फेडले