भाजपची माघार; काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली – कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्यापही सुरूच आहे. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार आहेत. मात्र तत्पूर्वी भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे आता काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

दरम्यान आज बहुमत सिद्ध करणार असून,कुमारस्वामी यांच्यासाठी बहुमत चाचणी अत्यंत महत्वाची आहे. याआधी त्यांनी ११७ आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. यासोबतच जेडीएस आणि काँग्रेसमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलं होतं. दरम्यान जेडीएसला पाच वर्ष समर्थन देण्यासंबंधी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे कुमारस्वामी यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत.

Loading...