कानडी तिढा : काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकातील राजकीय नट्य सुरूच आहे. या नाट्यात आता सस्पेंन्स आणखी वाढला आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत.

मी अध्यक्ष असल्यानं माझ्यावर जबाबदारी आहे. मला नियमानुसार काम करावे लागेल आणि मी योग्य तो निर्णय घेईन असं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. २०१८ मध्ये काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या १३ महिन्यात आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अस्थिर झालं. या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. पण, आपल्या राजीनाम्यावर मात्र १४ आमदार ठाम आहेत.Loading…
Loading...