कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय अनाकलनीय – धनंजय मुंडे

मुंबई – रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देखील दिली होती.

दरम्यान आज लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार रमेश कराड यांनी नाट्यमयरीत्या आपला अर्ज मागे घेतला. तोडपाणी करणाऱ्या नेत्यांबद्दल काय बोलणार? मी योग्य वेळी माझी भूमिका स्पष्ट करेन असं रमेश कराड यांनी म्हटलं आहे.

रमेश कराड यांच्या या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला हे अनाकलनीय असून. त्यांना पक्षानं उमेदवारी दिली आता आणखी काय करायचं, याचा निर्णय कराडांनी घ्यावा अस धनंजय मुंडे यांनी म्हंटल आहे.

 कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.

 

You might also like
Comments
Loading...