पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते तब्बल 11 वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Loading...

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणा पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, बाबासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आ. जीवनराव गोरे, आमदार राहुल मोटे, बसवराज पाटील नागराळकर यांच्या उपस्थित कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना गळाला लावले आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. तब्बल 11 वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे. धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादीची वाट धरली.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...