fbpx

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी !

 टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकतो. लोकसभेसाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयएम कडून मोहोळचे आमदार रमेश कदम लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची महिती पुढे येत आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस कडून मोहोळचे आमदार झालेले रमेश कदम यांनी अवघ्या सात महिन्यात मोहोळ मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला होता. त्याच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होवून हजारो तरुण त्यांचे चाहते झाले होते. मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता आणि आधी रस्ते मग वाळू या त्यांच्या आंदोलानामुळे ते घराघरात पोहचले होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात ते सध्या तुरुंगात आहेत. मात्र तुरुंगातून ते जिल्ह्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. यासाठी त्यांनी कासवगतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एमआयएम च्या नेत्यांच्या संपर्कात कदम समर्थक असुन उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. हा प्रस्ताव लवकरच एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार ओवेसी यांच्या समोर ठेवण्यात येणार आहे.

ओवेसीचा हिरवा कंदील मिळावा यासाठी कदम समर्थक आणि एमआयएमचे नेते प्रयत्न करत आहेत. दलित,मुस्लिम मतांवर या उमेदवारीचा परिणाम होवू शकतो. आमदार रमेश कदम यांची उमेदवारी जिल्ह्याच्या राजकारण बदलू शकते असे जाणकारांचे मत आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, भारिपचे अॅड.प्रकाश आंबेडकर,आरपीआयचे राजाभाऊ सरवदे, भाजपचे खासदार अमर साबळे हे आपल्या परीने प्रयत्न करत असतानाच कदमांच्या उमेदवारीने चुरस वाढली आहे.

1 Comment

Click here to post a comment