कबड्डी- कार्यकर्ते रमेश देवाडीकर काळाच्या पडद्याआड !

वेबटीम : महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे माजी सरचिटणीस रमेश देवजी देवाडीकर यांचे दि.२९जुलै २०१७ रोजी सकाळी ७-३०वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते ६५ वर्षाचे होते. त्यांनी आपले सर्व आयुष्य कबड्डीला वाहून घेतल्यामुळे ते अविवाहित होते. छत्रपती मंडळ डोंबिवली या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी बरेच वर्ष ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर प्रभारी सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर ते त्या जागेवर निवडून आले. त्यांच्या निधनाने मैदानावरील कार्यकर्ता आज हरपला.