विनायक निम्हण यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत रमेश बागवेंचे कानावर हात

पुणे – शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार असणारे विनायक निम्हण यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आपल्याला याबद्दल काहीही माहीत नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले आहेत.

नुकताच विनायक निम्हण यांचा वाढदिवस झाला, याच दिवशी निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी व्यूहरचना करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव निम्हण यांचा प्रवेश होऊ शकला नाही. निम्हण यांच्या प्रवेशाला काँग्रेसमधील एका गटाचा विरोध असल्याने त्यांचा प्रवेश होऊ शकला नसल्याच सांगण्यात येत आहे. दरम्यान, निम्हण यांना पक्षात घेण्यासाठी वरिष्ठ कंग्रेस नेत्यांची संमती असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Rohan Deshmukh

विनायक निम्हण यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली असेल तर मला माहित नाही. शहराध्यक्ष या नात्याने अद्याप पक्षाकडून मला विचारणा केली गेलेली नाही, ज्या वेळेस मला विचारण्यात येईल त्यावेळेस भूमिका स्पष्ट करेल. अस रमेश बागवे यांनी स्पष्ट केलं आहे.

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजपकडून कॉंग्रेसवर बिनबुडाचे आरोप – रमेश बागवे

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...