अमरावतीत दोन डॉक्टरांकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार, सहा जण अटकेत

remdesivir

अमरावती : केवळ सहाशे रुपयांना मिळणारे रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल १२ हजार रुपयांत विकल्याचा प्रकार दोन पोलिसामुळे समोर आला आहे. या कारवाईत दोन डॉक्टरांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनीही याप्रकरणी स्वतंत्र समिती गठित केली असून समांतर चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणात शहर पोलिसांनी तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन दत्तात्रय मालुसरे (३५, रा. फ्रेजरपुरा,अमरावती) डाॅ.अक्षय मधुकर राठोड (२४, भातकुली), शुभम कुमोद सोनटक्के (२४, अमरावती), शुभम शंकर किल्हेकर (२४, वडाळी), अनिल गजानन पिंजरकर (३८, अमरावती)आणि इर्विन रुग्णालयातील एक स्टाफ नर्स (२६ृ रा.भेडगाव, ता.बार्शीटाकळी) या सहा जणांना अटक केली आहे.

दोन पोलीस रुग्णांचे नातेवाईक बनून इंजेक्शन खरेदीसाठी पोहोचले. किमतीबाबत चर्चा केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत धडक कारवाई केली. या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर डॉ. अक्षय राठोड, इर्विन रुग्णालयातील स्टाफ नर्स, संजीवनी रुग्णालयाचा लॅब टेक्निशियन अनिल पिंजरकर आणि तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे अशी साखळीच या प्रकरणात स्पष्ट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP