चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला आर्थिकदृष्टया नेस्तनाबूत करा – बाबा रामदेव

नवी दिल्ली : चीनला आर्थिकदृष्ट्या नेस्तनाबूत करायचे असल्यास देशातील नागरिकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालणे गरजेचे आहे, असे वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पतंजली योगपीठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चीनला आर्थिकदृष्ट्या मागे टाकायचे असेल तर त्यांच्या उत्पादनावर बंदी घालणे गरजेचे आहे. त्यावेळी चीनला आक्रमकता म्हणजे काय ते समजेल. भारताला २०४० पर्यंत बलशाली राष्ट्र करायचे असल्यास चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले

You might also like
Comments
Loading...