रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांना ग्राहक कंटाळले ?

टीम महाराष्ट्र देशा : स्वदेश ह्या मुद्य्याचा मोठा गाजावाजा करत रामदेव बाबा यांनी पतंजली समूहाची स्थापना केली. स्वदेशचा नारा देत त्यांनी पतंजलीच्या माध्यमातून विविध उत्पादने बाजारात आणली. त्या उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये चांगली पसंती मिळाली होती. पण, २०१६ -२०१७ वर्षाच्या तुलनेत यावर्षी पतंजली उद्योग समूहाच्या उत्पादनाच्या विक्रीत सुमारे १० टक्क्यांनी घट झाली आहे.

पतंजली उद्योग समूह गतवर्षी यशाच्या शिखरावर होते. अनेक मल्टीनॅशनल कंपनींना पतंजलीने घाम फोडला होता, मात्र आता पतंजली उद्योग समूह स्पर्धेत चाचपडताना दिसतो आहे. उद्योग समूहाने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे पतंजली उद्योग समूहाला हा फटका बसला आहे. २०१६ ला पतंजली समूह जाहिरातीत एक नंबर वर होता, मात्र आता पतंजलीने जाहिरातीवरचा खर्चही कमी केला आहे.

दरम्यान, पतंजली उत्पादनाची मागणी प्रचंड वाढली, आणि त्या मागणीची पूर्तता होत नसल्याने, पतंजली समूहाने अन्य उत्पादकांकाडून उत्पादने बनवून घेतली आणि हीच बाब पतंजली समूहाला घातक ठरली आहे . पतंजली समूहाची विश्वासार्हता ढासळल्याने काही प्रमाणात पतंजली उद्योग समूहाला नुकसान सोसावे लागले आहे.Loading…
Loading...