एकच मोदी नरेंद्र मोदी, इतर दोन मोदींची मला माहिती नाही

Baba-Ramdev_

टीम महाराष्ट्र देशा- फक्त नरेंद्र मोदींना ओळखतो, पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींनी फसवणारे नीरव मोदी आणि आयपीएल घोटाळ्यातील ललित मोदी यांनी देशाची प्रतिमा मलीन केली आहे. नीरव मोदीवर कारवाई होऊन सरकार त्याला तुरुंगात पाठवेल आणि त्याच्याकडून पैशाची वसुली करेल, असा विश्वास योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांची भारतातील सर्व संपत्ती सरकारने जप्त करावी. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवता येणार नाही असं देखील ते म्हणाले.

काय म्हणाले रामदेव बाबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी काम करीत असल्यामुळे त्यांना मी ओळखतो, मात्र इतर दोन मोदींची मला माहिती नाही. नीरव आणि ललिद मोदी यांनी देशाला बदनाम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी. नीरव मोदी यांनी भ्रष्टाचार केला आहे, पण प्रकरण एकाएकी समोर कसे आले? ते देश सोडून कसे गेले? याची सरकारने चौकशी करावी. त्यांची भारतातील सर्व संपत्ती सरकारने जप्त करावी. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवता येणार नाही.