रामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती

टीम महाराष्ट्र देशा : लातूर येथे सोयाबीन प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी राज्याच्या फडणवीस सरकारनं लातूरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली समूहाला जमीन दिली आहे. तर ही जमीन भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र अनेक वर्ष झाली तरी राखीव जागेवर उद्योगसमूह उभारलेला नाही. त्यामुळे या राखीव जमिनीचा काही भाग पतंजली समूहाला दिल्याचं, वृत्त पीटीआयन प्रसिद्ध केले आहे.

या जमिनी बाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि रामदेव बाबा यांच्यात पत्र व्यवहार देखील झाला आहे. तर औसा भागात सूक्ष्म, लघू आणि मध्यम प्रकल्प सुरू करण्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी पत्रातून दिल आहे. तसेच हा प्रकल्प सुरु करण्यासाठी मुद्रांक शुल्कातून १०० टक्के सूट देण्यात येईल. याशिवाय वीजेच्या दरातही ठराविक कालावधीसाठी सवलत दिली जाईल. वीजेच्या एका युनिटमागे एक रुपयांची सूट देण्यात येईल,’ असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

तर शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या भागात सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात दोन सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प केंद्रं असल्यानं पतंजलीदेखील अशाच प्रकारचा प्रकल्प सुरू करेल, अस अधिकाऱ्यानं म्हंटल आहे. त्यामुळे राज्याच्या वाढत्या बेरोजगारीचा उपाय म्हणून रिकाम्या जमिनीवर पतंजली समूहाला प्रकल्प उभारणीसाठी सरकार तर्फे उत्तेजन दिले जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असताना औसामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी जमीन राखीव ठेवण्यात आली होती. मात्र १० वर्ष झाली तरी या राखीव जमिनीवर उद्योगसमूह उभा राहिला नाही. त्यामुळे ४०० एकर जागा पतंजलीला देण्याचे प्रयत्न फडणवीस सरकार कडून होत आहे.