रामदास तडस यांनी शेतकरी हितासाठी राजीनामा द्यावा, कोण करतंय मागणी  

ramdas tadas

वर्धा : कांद्यावर देशात असलेली निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी वर्ध्यात खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. खासदाराला एक किलो कांदा भेट देत केंद्र शासनाच्या निर्यातबंदीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने निर्यातबंदी न हटविल्यास खासदार रामदास तडस यांनी शेतकरी हितासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

देशात कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे हीत केंद्र सरकार लक्षात घेत नाही. एकीकडे जीवनावश्यक वस्तूचा कायदा केला जातो, तर दुसरीकडे निर्यातबंदी लादली जाते. लवकरात लवकर निर्यातबंदी उठविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध घोषणा देत खासदार तडस यांच्या घराजवळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी खासदारांना कांदा भेट देऊन निवेदन दिले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे, सतीश दाणी, सचिन डाफे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या :-