राज्यपालांच्या ‘त्या’ मागणीला आमचा पाठींबा-रामदास आठवले

राज्यपालांच्या ‘त्या’ मागणीला आमचा पाठींबा-रामदास आठवले

RAMDAS AATHAVLE

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या या मागणीला रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी पाठींबा दिला आहे.

‘महाराष्ट्रात महिला अत्याचार प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करून महिला अत्याचार रोखण्याबाबत चर्चा करण्याची राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे.’ असे ट्वीट रामदास आठवले यांनी केले आहे.

दरम्यान राज्यपाल यांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी असे मुख्यमंत्र्यांनी पत्रातून म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या