Ramdas Kadam । मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरेंच्या टीकांना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिल आहे. शिवसेनेतून जे फुटले ते भाजपाचे गुलाम झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे.
रामदास कदम म्हणाले कि, गुलाम कोण कोणाचं होतं हे बघा. तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का ? याचा विचार केला पाहिजे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती. मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती, मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकून येतील, असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. केसरकर म्हणाले की, केवळ राजकीय व्यक्तीवर कारवाई झाली असे नाही. जे निर्दोष असतील त्यांनी पुरावे सादर करावे. यापूर्वी भावना गवळी, यामिनी यादव आदींनी पुरावे सादर केल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई रोखण्यात आली. राऊतांच्या घरी जाणारे उद्धव ठाकरे हे यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावरील कारवाईनंतर भेटायला गेले नाहीत. यामिनी जाधव व भावना गवळी यांनी स्वतःलाच ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले, असा टोला त्यांनी लगावला. आता केसकरांच्या या टीकेवर शिवसेनेतून काय प्रतिक्रिया येतेय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते; पण संजय राऊत…, रामदास कदमांचा गौप्यस्फोट
- NCP on Eknath Shinde | “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील तर…” ; राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ शिंदेना आव्हान
- Uddhav Thackeray | इतरांना संपवण्याच्या मागे लागाल तर दिवस सर्वदा सारखे नसतात – उद्धव ठाकरे
- Deepak Kesarkar । राऊतांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ, मग यामिनी जाधव, भावना गवळींना का भेटले नाही?; केसरकरांचा सवाल
- Udhav Thackeray। संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<