मातोश्री दरबारी खैरेंचेच वजन; रामदास कदमांना धोबीपछाड

रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी

औरंगाबाद- शिवसेना उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर नामांतरासंदर्भात केलेली टिप्पणी रामदास कदम यांना चांगलीच भोवली असुन औरंगाबाद च्या पालकमंत्री पदावरून त्यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता डाॅ. दिपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी खा. खैरे मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. परंतु, शिवसेनेच्या मंत्र्यांमुळेच या कामात खोडा घातला जात असल्याचा आरोप खैरेंनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी प्रस्ताव केंद्राकडे असताना खैरे लोकसभेत काय करतात असा प्रश्न केला होता. या दोघांच्या विधानानंतर शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. खैरेंवरील केलेल्या शेरेबाजीमुळेच रामदास कदमांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरेंनी आपले मित्र नंदकुमार घोडेले यांना औरंगाबादच्या महापौरपदावर बसवले होते, त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी अभय मिळवले होते. चंद्रकांत खैरे घोडेलेंना घेऊन थेट ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांना आंधरत ठेवून हा निर्णय घेल्याचा सल रामदास कदमांना होता.

नामांतराच्या या आंदोलनातही सेनेतील गटबाजी उघडपणे समोर आली होती. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे गैरहजर होते. चार दिवसांपूर्वीच सिल्लोडचे नगरसेवक घरमोडे आणि N8 भागाचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भात खैरे शिष्टमंडळासह जिल्हाधिका-यांना भेटले, त्यावेळीसुद्धा दानवे नव्हते. त्यांचा दानवेविरोध नवा नाही, तर दुसरीकडे दानवे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यात जाधव आता गप्प बसले असले तरी खैरे-जाधवांची तू तू मैं मैं आजवर अनेक वेळा दिसून आली. दानवेंना जसा खैरेंचा विरोध तसा सेनेतील बिगर मराठा लॉबीचा विरोध असल्याचे दिसून आले आहे, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री औरंगाबाद शहरात येऊन गेले तेव्हा त्यांनी खैरेच्या विरोधी गटातील लोकांच्याच भेटी घेतल्या होत्या तर खैरे समर्थकांना याची भनक ही नाही लागली, कादमांच्या सांगण्यावरून दानवे यांनी निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे
,

You might also like
Comments
Loading...