Share

Ramdas Kadam | चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’ रामदास कदमांनी सांगितला, म्हणाले…

मुंबई : धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणा, यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये यासाठी चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटांनी आप-आपली बाजू निवडणूक आयोगासमोर सांगितली आहे. आता यावर लवकरच सुनावणी होणार आहे. परंतू त्याआधीच दोन्ही गटांकडून चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही याबाब एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम ?

निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास काय?,असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, यांना माहिती नाही की, निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेताना एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी 20 लाखांचं मतदान असतं याचाही विचार करेल. रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते. एक खासदार निवडून आणण्यासाठी 20 लाखांचं मतदान असतं. यांना अजून याची कल्पना नाही, यांना माहिती नाही की, हे सर्व यात गृहित धरलं जाईल, असं कदमांनी सांगितलं.

धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल

पुढे बोलताना ते म्हणाले की, याआधीचे निवडणूक आयोगाचे निकाल पाहिले तर ज्याच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती बहुमत आहे त्यांच्याच बाजूने निकाल येतो. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क आणि बीकेसी येथेही अधिक ताकद कुणाकडे आहे हे सिद्ध झालंय. लोकशाहीत ज्याच्याकडे अधिक संख्या त्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याचं स्वागत करू. तसेच एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला 100 टक्के विश्वास आहे की, धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल. पूर्ण बहुमत आमच्याकडेच आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणा, यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये यासाठी चढाओढ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now