मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज मोठ्या घटना घडत आहेत. राज्यातील सत्ता गमावल्यांनंतर दिवसेंदिवस सेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आज पुन्हा शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे.
कदम हे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री आहेत. शिवसेनेच्या नेतेपदावर देखील रामदास कदम होते. दरम्यान, कदम लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी राजीनामा दिलाय. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम गुवाहाटीतील शिंदे कॅम्पमध्येच दाखल झाले होते. ते शिंदे गटासोबत आहेत. तसेच रामदास कदम येत्या 2 दिवसांत पत्रकार परिषद आयोजित करून त्यात सविस्तर भूमिका मांडणार आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात रामदास कदम म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं. तसेच आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आलं, असाही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी
- Kishore Patil : शिवसेनेसारखी भाजपाची परिस्थिती होऊ नये यासाठी किरीट सोमय्यांना समज द्यावी – किशोर पाटील
- Bus accident in Indore । एकनाथ शिंदेंनी साधला मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
- Eknath Shinde : इंदौरहून जळगावला येणाऱ्या बसचा अपघात; मुख्यमंत्री शिंदेंकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा
- IND vs ENG : ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमागे ‘हा’ खेळाडू, ट्विटने केला खुलासा; वाचा!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<