पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकीचा फोन

मुंबई – काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकीचे फोन आले आहेत. खा. छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्यकर्त्यांकडून हे फोन आल्याचा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खा. संभाजी राजे यांनी नारायण राणे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. यावरून रामदास कदम यांनी छत्रपती संभाजी राजेंवर टीका केली. छत्रपती संभाजी राजेंबद्दल आम्हाला सन्मान आहे. पण त्यांनी कोणाची लाचारी पत्करू नये, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.

यावरूनच रामदास कदम यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना धमकावले असल्याचे समजते आहे. असं असलं तरीही या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

You might also like
Comments
Loading...