Ramdas Kadam | मुंबई : राज्यातील सत्ता गमावल्यांनंतर दिवसेंदिवस सेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काल माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला. कदम हे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री आहेत. शिवसेनेच्या नेतेपदावर देखील रामदास कदम होते. दरम्यान, कदम लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला.
यानंतर आता पुन्हा एकदा एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. यावेळी कदम म्हणाले की, माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. पण, अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोललं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं, असंही रामदास कदम यावेळी म्हणालेत. यावेळी वारंवार त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते.
दरम्यान, काल उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात देखील त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर भाष्य केलं होत. “२०१९ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात, त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करू नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचंही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे, असं सांगत रामदास कदम यांनी राजीनामा दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut PC : “नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री…”; संजय राऊत शिंदे गटावर संतापले
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! आज खासदार शिंदे गटात सामील होणार?
- MNS to Uddhav Thackeray | “बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी…” ; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला
- Eknath Shinde | शिवसेना हायजॅक? “आमच्यासोबत १२ खासदार नाही तर एकूण…” ; एकनाथ शिंदेंचा दावा
- IND vs ENG : इंग्लंडविरुध्द मालिका विजयामुळे टीम इंडियाच्या ODI रेटिंगमध्ये सुधारणा; वाचा!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<