… तर भाजपवाल्यांची चड्डी पिवळी झाली असती– रामदास कदम

ramdas_kadam

पालघर: शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान, भाजपवर टीकास्त्र सोडले. एकीकडे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना विजयी करण्यासाठी शिवसेना प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेंद्र गावित यांच्यासाठी भाजपसुद्धा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, जुने मित्र भाजप आणि शिवसेना एकमेकांवर तुफान फटकेबाजी करीत आहेत.

पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपचे मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना! पण आजची शिवसेनेची विराट सभा बघितली असती तर भाजपवाल्यांची चड्डी पिवळी झाली असती”.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, श्रीनिवास वनगा याला ‘मातोश्री’चे दरवाजे निवडणुकीनंतर बंद होतील असे तुम्ही म्हणता. पण ‘मातोश्री’चे दरवाजे उघडे आहेत, म्हणूनच तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत आहात, असेही कदम यांनी खडसावले.