Share

Ramdas Kadam | “चाळीस आमदारांना राजकारणातून संपवण्यासाठी…”; रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Ramdas Kadam | मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदार आणि खासदार घेऊन भाजप पक्षासोबत युती केली आणि राज्यात सरकार स्थापन केलं. यामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे गट असं चित्र पाहायला मिळतं आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सतत हल्ला करत असतात. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे.

काय म्हणाले रामदास कदम (Ramdas Kadam)

उद्धव ठाकरेंना 40 आमदारांनी मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी, त्यांना राजकारणातून पूर्ण संपवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. यासाठी उद्धव ठाकरेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगले काम हाती घेतलं आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या अडीच वर्षात 40 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात किती निधी दिला?, त्याच 40 मतदारसंघात अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना किती निधी पुरवला, ते जनतेसमोर आलं तर बरं होईल. पक्षात राहिलेले 10 ते 15 आमदार आहेत, ते कसे निवडून येतील याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना विकासासाठी खोके देत असल्याचं कदमांनी सांगितलं.

तसेच, गुवाहाटीवरून आमदार कसे येतात? वरळीच्या मतदारसंघातून कसे जातात? विधानसभेत पाय कसे ठेवतात?, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. मात्र, आमदार आले, त्यांनी पाय पण ठेवला. आतापर्यंत ठाकरे आडनावाची माणसे बोलत होती ते करत होती. याला गाडणार, त्याला गाडणार, याच्यावर आता कोण शेंबडं पोरग सुद्धा विश्वास ठेवणार नाही, असंही कदम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Kadam | मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदार आणि खासदार घेऊन भाजप पक्षासोबत युती केली आणि राज्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now