राज ठाकरे नऊ महिने झोपले होते का? त्यांचा पक्ष आता संपला आहे – रामदास कदम

मुंबई : राज्यातील प्लास्टिकबंदीवरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर निशाना साधला होता. दरम्यान तेव्हापासून सुरु झालेलं आरोप – प्रत्यारोपाचं राजकारण अद्यापही थांबायला तयार नाहीये.

राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे. व्यापाऱ्यांकडून सुपारी घेऊन त्यांनी शिवसेनेची बदनामी सुरु केल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील असल्फा विभागात शिवसेनेतर्फे कापडी पिशव्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

राज ठाकरे नऊ महिने झोपले होते का? त्यांचा पक्ष संपला आहे. व्यापाऱ्यांकडून सुपारी घेऊन शिवसेनेची बदनामी सुरु केली आहे. राज ठाकरे हे काळ्या मांजरासारखे निर्णयाला आडवे येत आहेत. इंग्लड सरकारकडूनही या निर्णयाला फॉलो केलं जात असल्याचं देखील कदम यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना कदम म्हणाले की, राज ठाकरे चुकलेले आहेत, असं मला वाटतं. या निर्णयाचं त्यांनी स्वागत करायला हवं होतं. सबंध जगाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. जागतिक निर्णय आहे. आपल्या देशाला त्याचं यजमानपद मिळालं आहे. 17 राज्यात जरी प्लास्टिकबंदी असली तरी जागतिक निर्णय झाल्यानंतर सुरुवात महाराष्ट्राने केली आहे. याचं त्यांनी स्वागत करायला हवं होतं.

लोकासांगे ब्रह्मज्ञान; भाजपच्या ‘हिटलरशाही’वर राज ठाकरेंचे फटकारे

व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का? 

You might also like
Comments
Loading...