खैरे हिरो की झिरो काळच ठरवेल: रामदास कदम

औरंगाबाद- औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केल्यानंतर पाहिल्याचं कदम यांची प्रतिक्रिया आली आहे माझे पालकमंत्री पद कशामुळे गेले हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. मला उद्धव साहेबांच्या आदेशाचे पालन महत्त्वाचे आहे ते मी शांतपणे पाळत आहे. परंतु खासदार चंद्रकांत खैरे स्वतःला हीरो समजत असतील तर ते हिरो की झीरो हे काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद चे माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

काय म्हणाले रामदास कदम?

माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही, असे ते म्हणाले. तुमचे पद गेल्याने खैरे समर्थकामध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे सध्यातरी खैरे औरंगाबाद चे हीरो झाले आहेत, असे सांगताच खैरे हीरो की झीरो हे नंतर ठरेल, असे सांगत त्यांनी विषय संपवला. कदम म्हणाले माझे पालकमंत्रिपद गेले असले तरी नांदेडला जाताना औरंगाबादहूनच जावे लागते. त्यामुळे कदम हे जिल्ह्यातील राजकारणात हस्तक्षेप करणार असे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे.