Share

Ramdas Kadam | “आदित्य ठाकरेंवर शेंबडं पोरगही…”; रामदास कदमांची बोचरी टीका

Ramdas Kadam | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. यातच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यानी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आणि खोके सरकार असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्य ठाकरेंना चांगलंच सुनावलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम (Ramdas Kadam)

मी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं फारसं उचित नाही. पण ‘सौ चुहा खा के बिल्ली हज चली’ असं व्हायला नको. आदित्य ठाकरेंचा या वयातही प्रचंड अभ्यास आहे. यासाठी त्यांचं अभिनंदन, असं म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कदम प्रसार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करणारा बॅनर लावला आहे. यावरून टीका करताना रामदास कदम पुढे म्हणाले की, स्वप्न बघायला कुणाची कसलीही अडचण नाही. त्यांनी स्वप्नामध्ये राहावं. शिवसेनेच्या आमदारांना संपवायचं त्यांचं स्वप्न होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले. शिवसेनेच्या आमदारांना संपवून त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण 40 आमदारांना वेळीच हे सगळं कळालं. त्यामुळे त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंना ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यांना भेटायचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, त्यांचं ऐकूनही घेतलं नाही. त्यामुळे आपली आमदारकी वाचवण्यासाठी संबंधित आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून कदाचित आज त्यांची आमदारकी वाचेल. नाहीतर सगळे आमदार संपले असते, शिवसेनाही संपली असती. शिवसेनेला संपवून अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते. पण 40 आमदारांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचललं. पण आदित्य ठाकरेंना आजही हे सगळं कळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. 40 आमदारांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. पण शेंबडं पोरगही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही
महत्वाच्या बातम्या :

Ramdas Kadam | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. यातच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now