राहुल गांधींंच्या पंतप्रधान पदावर रामदास आठवलेंची भविष्यवाणी, वाचा नेमक काय म्हणाले आठवले

पुणे: २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होवू शकतो असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भविष्यवाणी केली असून पुढील किमान 10-15 वर्ष राहुल गांधी हे पंतप्रधान होणार नसल्याच त्यांनी सांगितले आहे.

रामदास आठवले यांनी आज कोरगाव भिमातील पूजा सकट हिच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पूजा सकट आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे, तसेच तिच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.

कर्नाटक निवडणुकीत आरपीआय ३० जागांवर लढत आहे, तर 194 जागेवर पाठिंबा दिला आहे त्यामुळे भाजपला बहुमत मिळेल. मोदी सरकार कायदा बदलणार असल्याची चर्चा केली जाते, पण आपण कायद्याचे संरक्षण करू असे आश्वासन मोदींनी आम्हाला दिल्याच रामदास आठवले यांनी सांगितले आहे.मी भाजपसोबत असल्याने माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याच म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच नाव न घेता टीका केली. काँग्रेस आणि सर्वांनी मिळून दलित अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही ते म्हणाले.