संभाजी भिडे यांच्या सभांना बंदी घालावी – रामदास आठवले

जालना : संभाजी भिडे यांच्या उलट सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होतेय त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.

भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवले यांनी म्हटलंय.ते जालन्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलतं होते.

सोमवारी संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये बोलताना माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत.याबात रामदास आठवले यांना विचारले असता त्यांनी संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालावी अशी मागणी केली.