जय भीमच्या एकजुटीचा नारा कायम ठेवा – रामदास आठवले

मुंबई  : भीमा कोरेगाव येथे निरपराध आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यामुळे आंबेडकरी जनता प्रचंड संतापली होती. स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे आपला संताप भीमसैनिकांनी व्यक्त केला. महाराष्ट्रभर सर्व रिपब्लिकन गट तट बाजूला सारून राज्यभरातील आंबेडकरी जनतेने एकजुटीने निषेध आंदोलनात उतरली. जय भीमच्या एकजूटीची बुलंद ताकद महाराष्ट्राने आज पाहिली असे सांगत जयभीमच्या एकजुटीचा नारा कायम ठेवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .

आज शांततेने भीमसैनिकांनी राज्यभर आंदोलन केल्याबद्दल रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.राज्यभरातील पोलीस ठाणे ; तहसील कचेरीवर रिपाइं च्या वतीने आज निदर्शने आणि धरणे तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली.

Loading...

मुंबईसह राज्यभर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकतेने रस्त्यावर उतरून रास्ता रोको आणि तीव्र निदर्शने केल्याने आजचा महाराष्ट्र बंद प्रचंड यशस्वी झाला . मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आजच्या निषेध आंदोलनात सर्वत्र आघाडीवर होते. रिपाइं च्या आक्रमक कार्यकर्त्यांनी मुंबईची नाकेबंदी केली होती. सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. महाराष्ट्राच्या रस्त्यास्त्यावर निळा झेंडा आणि एकच साहेब बाबासाहेब च्या घोषणांनी मुंबई दणाणून गेली होती. मुंबईत दहिसर चेकनाका येथे रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे अभयाताई सोनावने रमेश गायकवाड आदींच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मुलुंड चेकनाका येथे रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड योगेश शिलवंत सौ अनिता अलंकार जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत या हल्ल्यातील गुन्हेगारांवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाइंतर्फे आज संपूर्ण मुंबईतील पोलीस ठाण्यावर देण्यात आले. आंदोलन शांततेने पार पडले तसेच चोख बंदोबस्त ठेऊन सुव्यवस्था ठेवल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आभार मानले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?