fbpx

वाद न करता महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना भाजप ने एकत्र यावे – रामदास आठवले

मुंबई – शिवसेना खासदारांची नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलले . त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. मागील 25 वर्षांपासून असलेली शिवसेना भाजप ची युती कायम राहिली पाहिजे . कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ असा वाद न करता महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना भाजप यांची आगामी निवडणुकीत युती झाली पाहिजे.त्यासाठी आपण लवकरच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.

समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय तसेच दादर येथील महापौर निवासस्थानी उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून युती होण्यासाठी तेही सकारात्मक आहेत. भाजप शिवसेनेने कोण मोठा हा वाद न करता एकत्र आले पाहिजे आमच्या साठी दोन्ही पक्ष मोठे भाऊ आहेत असे सांगत शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाच्या युतीला आमच्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असेल असे ना रामदास आठवलेंनी आज स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्षाच्या युतीला रिपाइंचा पाठिंबा असेल आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना दोन्ही पक्षांनी मुंबईतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी या रिपाइंच्या मागणीसाठी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

2 Comments

Click here to post a comment