मुंबईत परप्रांतीय यूपी बिहारींना हटविण्याचा प्रयत्न रिपाइं ने हाणून पाडला – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – मुंबईत काही शक्तींनी परप्रांतीय मुद्यावरून येथील यूपी बिहारी लोकांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र रिपब्लिकन पक्षाने सदैव मुंबईत परप्रांतीयांना साथ देऊन त्यांना हटविण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार देशांतर्गत कोणीही कोणत्याही राज्यात राहू शकतो नोकरी उद्योग करू शकतो हा दिलेला अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातूनही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी अनेक निरपराध शांतताप्रिय परप्रांतीयांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. रिपाइं कार्यकर्ते मानवतेचे राक्षणकर्ते ठरले आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ते जोगेश्वरी येथील श्री राम मंदिरात अयोजित बिहारी सुडी समाजाच्या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते.

Loading...

बिहार ही बुद्धांची भूमी आहे. बिहार म्हणजेच विहार आहे. तेथे महाकारूणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. बिहार मध्ये स्थापन झालेला बौद्ध धम्म जगभरात पोहोचला आहे याचा आम्हाला अभिमान आहे. बिहारी असो की मराठी सर्वांनी राष्ट्रीय एकतेनुसार बंधुत्वाने राहिले पाहिजे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आहोत. देते है जय भीम का नारा तो दुष्मनोंके बज जाते है बारा अशी शीघ्र कविता ना रामदास आठवले यांनी यावेळी सादर केली. बिहारी सुडी समाजाचे लोक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय