‘नाईट लाईफ’ ही तरुणांना चोवीस तास बिघडविणारी व्यवस्था ठरेल – रामदास आठवले

नाशिक – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात 24 तास आस्थापना सुरू ठेवण्याचे ;रात्रभर हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्याची व्यवस्था सुरू करण्याचा तत्वतः निर्णय राज्य सरकार ने मंजूर केला आहे. मात्र ही चोवीस तास शहर सुरू ठेवण्याची व्यवस्था तरुणांना बिघडविणारी; गुंडगिरी वाढविणारी; स्त्रियांसाठी असुरक्षित व्यवस्था ठरेल त्यामुळे या नाईट लाईफ व्यवस्थेला रिपब्लिकन पक्षाचा विरोध असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

नाशिक येथील सिद्धी बँक्वेट हॉल येथे रिपाइं च्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा ना रामदास आठवले यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ; श्रीकांत भालेराव; राजा कापसे; राजेंद्र गुप्ता ; एड.कोमल गुप्ता; सुनिल रोकडे; गुंफाताई भदरगे; मनाली जाधव; प्रवीण मोरे;हेमंत रणपिसे; घनश्याम चिरणकर; चंद्रशेखर कांबळे; बाळकृष्ण गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Loading...

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर चोवीस तास प्रवासी वाहतूक असते त्या ठिकाणी रात्रभर प्रवाश्यांसाठी भोजनव्यवस्थेची अवश्यकता असते त्या ठिकाणी चोवीस हॉटेल सुरू ठेवले पाहिजेत मात्र मुंबई सारख्य शहरांमध्ये नाईट लाईफ सुरू केल्यास गुंडगिरी वाढण्याची शक्यता आहे. रात्रभर फिरण्याची तरुणांना सवय लागली तर दैनंदिन जीवनात नोकरी साठी जाणारे लोक नोकरी जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे नाईट लाईफ सुरू करण्याचा शासनाचा निर्णय अयोग्य असून पोलिस यंत्रणांना ही याचा अतिरिक्त ताण येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामूळे नाईट लाईफ ही संकल्पना समाजाच्या हिता पेक्षा अधिक नुकसान करणारी व्यवस्था ठरेल त्यामुळे नाईट लाईफ चा निर्णय शासनाने रद्द करावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'