Share

Ramdas Athvale | “उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार“

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीमध्ये वापरण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव आणि मशाल हे ‘चिन्ह’ दिलं आहे. मशाल चिन्हावरून अनेकांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी यासगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले ?

अंधेरी पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भाजपाच्या उमेदवारास पाठिंबा आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल जरी पेटलेली असल्याचं दाखवलेलं असलं तरी या निवडणुकीत ही मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं म्हणत रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपाचं कमळ आम्हाला फुलवायचं आहे आणि मशाल विझवायची आहे. यासाठी रिपब्लिकन पक्ष नक्कीच भाजपाच्या पाठिशी उभा राहणार आहे. ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. कारण, आमच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मजबूत अशी महायुती आहे, असा विश्वासही रामदास आठवले यांनी याठिकाणी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. परंतू आता यामध्ये पुढे काय होणार, कोणारा शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीमध्ये वापरण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव आणि मशाल हे ‘चिन्ह’ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now