मुंबई: जगभरात कोरोनाने थैमान घातले होते.सर्वसामान्य नागरिक ते अनेक सेलिब्रेटी,खेळाडू,राजकीय नेते हे सर्वच कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. यातच सुरवातीला जेव्हा जगभर कोरोनाचा प्रसार वाढत होता त्यावेळी लोकांचे मनोबल उंचावण्यासाठी ‘गो कोरोना गो’ हा नारा देणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली होती.
रामदास आठवले यांना गेल्या 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती.आठवले कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात देखील सतत लोकांच्या सेवेसाठी सोबतच पक्षवाढीसाठी काम करणारे रामदास आठवले हे कोरोना बाधित झाल्याने रिपाईचे अनेक कार्यकर्ते साहेब लवकर बरे व्हावेत यासाठीं प्रार्थना करत होते.
या प्रार्थना आणि डॉक्टरांची मेहनत फळाला आली असून आता आठवले हे कोरोनामुक्त झाले आहेत. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवले कोरोनामुक्त झाल्याचं कळताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराजवळ शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. अखेर त्यांची ही चाचणी कोरोना निगेटिव्ह आली आहे. मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार : थोरात
- माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे – अर्णब गोस्वामी
- ‘मिलिंद सोमण, उम्र पचपन की और हरकते बचपन की…,’
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे