… तर मायावतींनी भाजपला पाठींबा द्यावा – रामदास आठवले

डेहराडून : सध्या देशभरात मोदी लाट असून, अजून १५ ते २० वर्ष भाजप सत्तेत राहणार आहे. पंतप्रधानांवर जनतेचा विश्वास आहे. मोदी सबका साथ, सबका विकासावर भर देतात, त्यामुळे २०१९ ला पुन्हा एकदा देशात भाजपची सत्ता येईल. जर मायावतींना दलितांसाठी खरचं काही करायचे असेल तर त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा असं आठवले यांनी म्हंटलं आहे. त्यांनी डेहराडूनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

तसेच त्यांनी क्रिमीलेअर अंतर्गत येणाऱ्या जातींना आरक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी ४९.५ टक्क्यांवरून ७५ करावी अशी मागणी देखील यावेळी केली. २०१९ ला राहुल गांधी पंतप्रधान होणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता मोदीलाट ओसरली नसल्याने पुढील १५ वर्ष तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.