हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान; कॉंग्रेसवर रामदास आठवलेंचा हल्लाबोल

हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान; कॉंग्रेसवर रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Ramdas Athawale

मुंबई: आजचा दिवस म्हणजेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Constitution Day) म्हणून देशभरात साजरा केला जातो. केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एकेकाळी भाजप सोबत असणारी शिवसेनेने देखील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या बद्दल पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. संविधान कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेस पक्षावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

संविधान दिन कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याची वेळ जेंव्हा जेंव्हा येते तेंव्हा तेंव्हा काँग्रेसने पाठ दाखविली आहे. आजही संविधान दिनावर बहिष्कार टाकून काँग्रेसने आपला खरा चेहरा दाखविला आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कॉंग्रेस पक्षावर त्याच सोबत विरोधी पक्षांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या: