दलित शब्द वापरण्यास मनाई,आरपीआय जाणार सर्वोच्च न्यायालयात

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दलित शब्दाचा उपयोग करण्यास मनाई केली आहे मात्र आता या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरपीआय याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन व प्रसार माध्यमांमधून दलित शब्दाचा उपयोग करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दलित शब्द वापरण्यास मनाई केली आहे.

नक्षलवादी समर्थकांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

सरकारी कामकाजाजत आधीपासून अनुसूचित जाती आणि जमाती असे शब्द वापरले जात आहेत. त्यामुळे या शब्दाचा वापर सुरू ठेवावा अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी- प्रकाश आंबेडकर